सेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन

ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.

Updated: Sep 26, 2017, 01:07 PM IST
सेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.

रविवारी गिलख्रिस्टने त्याच्या ट्विटर पेजवर टीम इंडियाच्या विरेंद्र सेहवागची आठवण काढली. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोरच्या होळकर मैदानात तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना ५ विकेटने मात दिली आणि ५ सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये ३-० ने आघाडी घेतली. याच मैदानात २०११ मध्ये विरेंद्र सेहवागने धमाकेदार बॅटींग केली होती. टीम इंडियाचे टॉस जिंकला होता आणि ओपनिंगसाठी आलेल्या सेहवागने दमदार फटकेबाजी केली होती. या सामन्यात त्याने १४९ बॉलमध्ये २१९ रन्सची बरसात केली होती. या खेळीत त्याने २५ फोर आणि ७ सिक्सर लगावले होते. 

गिलख्रिस्टने ट्विट करत सेहवाग हा विरोधी टीमसाठी डोकेदुखी असल्याचे म्हटले. त्याने ट्विटरवर एक फोटोही शेअर केला. त्यात रिपोर्टरचा प्रश्न आहे की, सेहवागला रोखण्यासाठी काय प्लॅन केला आहे? यावर गिलख्रिस्टचं उत्तर होतं की, होय...आमच्याकडे प्लॅन आहे. आम्ही सेहवागला हॉटेलच्या रूममध्ये बंद करण्याचा प्लॅन तयार करत आहोत.