बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीसोबत केला खेळाडूनं विवाह

 घोषविरुद्ध एका १८ वर्षीय तरुणीनं बलात्काराची तक्रार दाखल केली होती

Updated: Aug 7, 2018, 05:55 PM IST
बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीसोबत केला खेळाडूनं विवाह

मुंबई : भारतीय टेबल टेनिस खेळाडू सौम्यजीत घोषवर चार महिन्यांपूर्वी एका तरुणीनं बलात्काराचा आरोप केला होता... याच तरुणीसोबत आता घोषनं विवाह केलाय. 

विश्व रँकिंगमध्ये करिअरच्या सर्वश्रेष्ठ ५८ व्या स्थानावर पोहचणाऱ्या घोषविरुद्ध एका १८ वर्षीय तरुणीनं बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २५ वर्षीय घोषला राष्ट्रकूल स्पर्धेच्या टीममधून घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याला आशियाई खेळांतही टीममध्ये जागा मिळाली नाही. 

यामुळे घोषला चांगलाच झटका बसला होता. 'प्रत्येक जण मुलीबद्दल विचार करत होता... ती तरुण आहे... मीही तरुण आहे... आम्ही जेव्हा डेटिंग सुरू केली तेव्हा ती अल्पवयीन होती आणि मी २२ वर्षांचा... मी अजून तरुण आहे मला मागे पाहायला आवडणार नाही... भविष्यावर मला लक्ष्य केंद्रीत करायतचंय...' असं घोषनं म्हटलंय. 

Saumyajit Ghos
 

उल्लेखनीय म्हणजे, घोषविरुद्ध हा गुन्हा जेव्हा दाखल झाला तेव्हा तो जर्मनीत खेळत होता... भारतात अटकेपासून वाचण्यासाठी तो युरोपच्या वेगवेगळ्या देशांत लपत राहिला... आणि मे महिन्यात तो भारतात परतला होता. 

आता विवाहानंतर पुन्हा आपल्याला खेळात परतता येईल अशी आशा घोषला लागलीय.