मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली त्या कारणामुळे प्रत्येकजण संघाचे कौतुक करीत आहे. त्याचवेळी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले तसेच या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी करणाऱ्या सलामीवीर फलंदाज शुभमन गिलचे कौतुक केले आणि भारतीय क्रिकेटमधील सुवर्ण भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शशी थरूर यांनी शुभमन गिलबद्दल एक ठळक भविष्यवाणी केली आणि ते म्हणाले की, विराट कोहलीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा कर्णधार होण्याची क्षमता शुबमन गिलमध्ये आहे.
शशी थरूर म्हणाले की, शुभमन गिलने कसोटी मालिकेदरम्यान अशा प्रकारे कामगिरी केला की त्याच्या खांद्यावर एक मोठी आणि जुनी जबाबदारी आहे. पुढची काही वर्षे त्याने असेच सातत्य ठेवल्यास विराट कोहलीनंतर तो भारतीय संघाचा पुढचा कर्णधार बनणार आहे आणि मला त्याबद्दल काहीही शंका नाही. त्याच्याकडे अपवादात्मक आत्मविश्वास आहे आणि मला वाटते की त्याचे भविष्य पूर्णपणे निश्चित झाले आहे.
शुबमन गिलविषयी बोलताना थरूर म्हणाले की, त्याच्याबद्दल बर्याच गोष्टी आहेत ज्या बघायला फारच आश्चर्यकारक वाटतात. 21 वर्षांच्या या युवा फलंदाजीबद्दल मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे तो खूप शांत आणि आत्मविश्वासू आहे. त्यांच्या सभोवताली कोणत्याही प्रकारच्या चिंताग्रस्त ऊर्जा नसते. त्यांच्याभोवती अनिश्चिततेसारखे काहीही नाही. मी सांगतो, गिलच्या स्ट्रोक-प्ले, तंत्र आणि त्याच्या स्वभावाचे कायम कौतुक केले जात आहे. शशि थरूरने क्रिकबझच्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या मेलबर्न कसोटी सामन्यात त्याला भारताकडून सलामीची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने चांगली कामगिरी केली. त्याने तीन कसोटी सामन्यांच्या 6 डावांमध्ये 259 धावा केल्या, दुसऱ्या डावातील 91 धावांची खेळी ही या कसोटी मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली. चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली.