Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने या सामन्यात 50 रन्सची नाबाद खेळी केली. शिवम दुबेने 35 बॉल्समध्ये नाबाद 31 रन्स केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. या सामन्यात टीम इंडियाची डाव डगमगताना दिसत होता.

सुरभि जगदीश | Updated: Jun 13, 2024, 09:50 AM IST
Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला title=

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमध्ये चांगला खेळ करतेय. भारताने आतापर्यंत लीग स्टेजचे 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. बुधवारी न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर अमेरिका विरूद्ध भारत यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 7 विकेट्सने भारताने अमेरिकेवर विजय मिळवला. अमेरिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 10 चेंडू बाकी असताना सामना जिंकला. 

सूर्यकुमार यादवने या सामन्यात 50 रन्सची नाबाद खेळी केली. शिवम दुबेने 35 बॉल्समध्ये नाबाद 31 रन्स केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. या सामन्यात टीम इंडियाची डाव डगमगताना दिसत होता. पण सूर्या आणि दुबे यांनी टीमला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर रोहित शर्माने विजयाच्या स्ट्रॅटेजीचा खुलासा केला. 

अमेरिकेविरूद्ध विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, लक्ष्याचा पाठलाग करणं कठीण जाईल हे आम्हाला माहीत होतं. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि भागीदारी केली ते कौतुकास्पद आहे. या खेळीचं श्रेय सूर्या आणि शिवम दुबे यांना जातं. सूर्याचा खेळ वेगळा आहे. अनुभवी खेळाडूंकडून हेच ​​अपेक्षित आहे. त्याने ज्या प्रकारे खेळ पुढे नेला आणि आम्हाला जिंकण्यास मदत केली ते कौतुकास्पद आहे. याशिवाय आम्हाला कल्पना होती की, गोलंदाजांना पुढाकार घ्यावा लागेल आणि जबाबदारी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे आम्ही खेळाला सुरुवात केली. या ठिकाणी धावा करणं कठीण होतं. सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, विशेषतः अर्शदीप सिंगने.

सुपर-8 मध्ये स्थान मिळवण्याबाबत रोहित म्हणाला, "हा मोठा दिलासा आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं. तिन्ही सामन्यांमध्ये आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहावं लागणार आहे. या विजयांमुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल." 

युएसएने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 110 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 10 बॉल राखून 111 धावांचं आव्हान पूर्ण केलं. भारताकडून अर्शदीप सिंगने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या तर सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक ठोकलंय. टीम इंडियाने युएसएचा पराभव केल्यानंतर आता सुपर 8 मध्ये एन्ट्री केलीये.

युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), एरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.

टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.