शोएब-वसिमच्या अभिनयाची सोशल मीडियावर खिल्ली

अनेक वर्षांनंतर 'सुल्तान ऑफ स्विंग' वसिम अक्रम आणि 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तर नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येतायत. 

Updated: May 31, 2017, 03:27 PM IST
शोएब-वसिमच्या अभिनयाची सोशल मीडियावर खिल्ली title=

नवी दिल्ली : अनेक वर्षांनंतर 'सुल्तान ऑफ स्विंग' वसिम अक्रम आणि 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तर नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येतायत. 

मैदानात फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे हे दोघे आता अभिनयाच्या दुनियेत कमाल दाखवणार आहे. मात्र त्यांच्या फॅन्सचा हा नवा अवतार आवडलेला दिसत नाहीये. त्यांच्या अभिनयावरुव सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जातेय.

वसिम आणि शोएब यांच्या शोचा एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आलाय. या व्हिडीओनंतर फॅन्सकडून या दोघांची चांगलीच खिल्ली उडवली जातेय.

शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यांचा या शोमधील अभिनय पाहता त्यांचे फॅन्स म्हणतायत की लहानपणीच्या हिरोंना अशा स्थितीत बघणे पटत नाही.