तेहरान : इराणमध्ये झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय टीमनं महिला आणि पुरुष गटाचं अजिंक्यपद पटाकवलं.
फायनलमध्ये भारतीय पुरुष टीमनं पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 36-22 नं पराभव केला. साखली सामन्यातही भारतीय टीमनं पाकिस्तानचा 44-18 नं धुव्वा उडवला होता.
प्रदीप नरवाल, सुरेंदर नाडा, मनिंदर सिंग, अजय ठाकूर आणि संदीप नरवालनं भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर महिला टीमनं कोरियावर 42-20 नं मात करत अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं. मुंबईकर अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीयमहिला टीमनं हा विजय साकारला.