BCCI Chief Selector: भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर; दिग्गजांना टाकलं मागे

New BCCI Chief Selector: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनला आहे. लवकरच अजित आगरकर त्यांचा पदभार स्विकारणार आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Jul 4, 2023, 10:51 PM IST
BCCI Chief Selector: भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर; दिग्गजांना टाकलं मागे title=

New BCCI Chief Selector: अखेर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदावर शिक्कामोर्तब झालंय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनला आहे. लवकरच अजित आगरकर त्यांचा पदभार स्विकारणार आहेत. दरम्यान यानंतर आगरकर ( Ajit Agarkar ) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 टीमची निवड करण्यासाठी निवड समितीच्या बैठकीचे अध्यक्ष पद भूषवतील.

सिलेक्शन कमिटीच्या चीफ पदासाठी अजित आगरकरचं नावं आघाडीवर होतं. अजित आगरकर ( Ajit Agarkar ) दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफचे सदस्य होतं. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसाठी क्यांनी सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. दरम्यान नुकताच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. 

आगरकरांनी घेतली चेतन शर्मांची जागा

चेतन शर्मा ( Chetan sharma ) हे मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहत होते. वर्षाच्या सुरुवातीला झी मीडियाने ( Zee media ) केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर शर्मा यांना टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर शिवसुंदर दास प्रभारी चीफ सिलेक्टर जबाबदारी सांभाळत होते. मात्र आता या जागी अखेर अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांची वर्णी लागली आहे. 

टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) मंगळवारी अशोक मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) मुलाखतीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर आगरकर यांना मुख्य निवडकर्ता म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 टीमची करणार निवड

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी वनडे आणि टेस्ट सिरीजसाठी खेळाडूंची निवड झालीये. टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाची निवड होणं बाकी आहे. अशातच आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 टीम निवडण्यासाठी निवड समितीच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान करतील.