श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली

श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे. 

Updated: Jun 7, 2017, 12:46 PM IST
श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली title=

लंडन : श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे. 

मॅथ्यूज फलंदाजीसाठी फिट झाल्याने भारतासाठी ही चिंतेची बाब झालीये. मॅथ्यूज म्हणाला, दुखापतीतून सावरत आहे. गेल्या सामन्यात मी खेळू शकलो असतो मात्र यात धोका होता. त्यामुळे मी खेळलो नाही. मात्र आता मी पूर्णपणे फिट आहे. मी गोलंदाजी करणार नाही. मात्र फलंदाजीसाठी मी फिट आहे.

उद्या भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगतोय. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवल्याने भारताकडे २ गुण आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकत उपांत्यफेरी गाठण्याच्या लक्ष्याने भारत मैदानात उतरेल. 

आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होतोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास श्रीलंकेला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताविरुद्ध विजय मिळवणे अंत्यंत गरजेचे असणार आहे.