हार्दिक पांड्याला अनिल कपूर यांनी दिलं ‘झक्कास’ उत्तर!

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरची सुरूवात ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यातून केली होती. सुरूवातीच्या सामन्यांमध्येच त्याने आपली छाप सोडली होती.

Updated: Sep 21, 2017, 01:50 PM IST
हार्दिक पांड्याला अनिल कपूर यांनी दिलं ‘झक्कास’ उत्तर! title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरची सुरूवात ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यातून केली होती. सुरूवातीच्या सामन्यांमध्येच त्याने आपली छाप सोडली होती.

आता तर त्याचा खेळ आणखीन खुलताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सीरिज सुरू असून ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या विजयात धोनी आणि हार्दिक पांड्याची महत्वाची भूमिका राहिली. त्याच्या या प्रदर्शनाचं अभिनेते अनिल कपूर यांनी कौतुक केलं आहे. 

हार्दिक पांड्याने धोनीला अतिशय महत्वाची आणि दमदार साथ दिली. हा सामना पाहिलेल्या प्रत्येकाला याचा अनुभव आला असेल. त्यामुळेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. यात अनिल कपूर यांचाही समावेश आहे. अनिल कपूर यांनी या सामन्यानंतर धोनी आणि हार्दिकसाठी त्यांच्या खास शैलीत एक ट्विट केलं. यावर हार्दिकने सुद्धा ‘झक्कास’ उत्तर दिलं. 

अनिल कपूर यांनी लिहिले की, ‘भारताचा जोरदार विजय! हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी खरे चॅम्पियन्स आहेत! किती शानदार सामना होता.’

यावर जराही उशीर न करता हार्दिकने रिप्लाय दिला. 

पांड्याने लिहिले की, ‘धन्यवाद सर! मी तुमचा खूप मोठा फॅन आहे’.

यावर अनिल कपूर यांनी त्याला रिप्लाय केला की, ‘तू काल ज्या पद्धतीचा खेळ केला, त्यानंतर संपूर्ण देश तुझा फॅन झाला आहे! तुझा आणि टीम इंडियाचा अभिमान आहे’.