Arjun Tendulkar : वडिलांच्या जीवावर अर्जुन IPL मध्ये? नेपोटीझ्मबाबत व्यंकटेश, यशस्वीला काय वाटतं?

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) नेपोटीझ्ममुळे आयपीएलमध्ये जागा मिळाली असा, सवालही करण्यात येतो. याचसंदर्भात टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) आणि यशस्वी जयस्वालला प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर या दोन्ही खेळाडूंनी खुलेपणाने उत्तर दिलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 3, 2023, 06:07 PM IST
Arjun Tendulkar : वडिलांच्या जीवावर अर्जुन IPL मध्ये? नेपोटीझ्मबाबत व्यंकटेश, यशस्वीला काय वाटतं? title=

Arjun Tendulkar : नेपोटीझ्म हा शब्द यापूर्वी तुम्ही बॉलिवूडमध्ये ऐकला असेल. कोविड काळात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नेपोटीझ्म ( Nepotism ) हा शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत होता. दरम्यान क्रिकेटमध्ये नेपोटीझ्म असतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये नेपोटीझ्म आहे, तसं क्रिकेट टीम इंडियामध्ये ( Team India ) आहे का असा सवाल करण्यात येतो. यावेळी अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) नेपोटीझ्ममुळे आयपीएलमध्ये जागा मिळाली असा, सवालही करण्यात येतो. 

Arjun Tendulkar ला नेपोटीझ्ममुळे मिळाली जागा?

सोप्या शब्दात नेपोटीझ्म ( Nepotism ) म्हणजे काय तर योग्यतेला डावलून ओळखीच्या किंवा नात्यातील व्यक्तीला प्राधान्य देणं. ज्यावेळी अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती, त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुनवर ( Arjun Tendulkar ) नेपोटीझ्मची टीका करण्यात आली होती. 

दरम्यान याचसंदर्भात टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) आणि यशस्वी जयस्वालला प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर या दोन्ही खेळाडूंनी खुलेपणाने उत्तर दिलं आहे. 

नेपोटीझ्मवर काय म्हणाला व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) ?

एका पॉडकास्टमध्ये बोलताना व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) म्हणाला की, माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकारचा नेपोटीझ्मचा ( Nepotism ) अनुभव घेतलेला नाही. मी माझ्या कोणत्याही मित्र किंवा क्रिकेटर मित्रांकडून अशा कोणत्याही घटनेबद्दल ऐकलेलं नाही. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, आजवर अशी परिस्थिती माझ्यासमोर आली नाहीये.

माला विश्वास आहे की, ज्यावेळी जेव्हा मी चांगली कामगिरी केली तेव्हा मी टीममध्ये होतो. जेव्हा मी कामगिरी केली नाही तेव्हा मी टीममध्ये नव्हतो, असंही अय्यर ( Venkatesh Iyer ) म्हणाला.

घराणेशीवर काय म्हणाला जयस्वाल?

नुकतंच लल्लनटॉपने यशस्वी यजस्वालचा ( Yashasvi Jaiswal ) एक इंटरव्यू घेतला. या इंटरव्यूमध्ये जयस्वालला नेपोटीझ्मबाबत प्रश्न करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, आपल्याला काही माहित असल्याची प्रतिक्रिया यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) दिली आहे.