Ritika Sajdeh: गंभीर कोच बनताच रितिकाची इन्स्टा पोस्ट व्हायरल, 'या' व्यक्तीसाठी खास मेसेज करत म्हणाली, समायरा तुला...!

Ritika Sajdeh: भारतीय टीमचे प्रमुख म्हणून गौतम गंभीर राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. रोहितनंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने देखील राहुल द्रविडचे आभार मानले. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 10, 2024, 07:23 PM IST
Ritika Sajdeh: गंभीर कोच बनताच रितिकाची इन्स्टा पोस्ट व्हायरल, 'या' व्यक्तीसाठी खास मेसेज करत म्हणाली, समायरा तुला...! title=

Ritika Sajdeh: मंगळवारी टीम इंडियाच्या नव्या कोचची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीर यांना टीम इंडियाचे नवे कोच म्हणून घोषित केलं आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर माजी कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. गंभीरची कोच म्हणून नियुक्ती झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेहची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल होतेय. ही पोस्ट तिने खास माजी कोच राहुल द्रविड यांच्यासाठी केली आहे.  

भारतीय टीमचे प्रमुख म्हणून गौतम गंभीर राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. रोहितनंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने देखील राहुल द्रविडचे आभार मानले. रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये राहुल द्रविडला WORK WIFE म्हटलं होतं. यानंतर रितिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रोहितची पोस्ट शेअर करत राहुल द्रविड त्यांच्या कुटुंबाच्या किती जवळ होते, याची माहिती दिली आहे. 

काय म्हणाली रितीका सजदेह?

रितीकाने रोहितची पोस्ट शेअर करत म्हटलंय की, 'तुमच्याविषयी मनात खूप भावना आहेत. तू आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप महत्वाचा आहेस. तुमची खूप आठवण येणार आहे. मला वाटतं की, समायरा तुम्हाला जास्त मिस करेल. गौतम गंभीरची कोच म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रितिकाची ही पोस्ट व्हायरल झालीये.

रोहित शर्मानेही द्रविडसाठी केलेली खास पोस्ट

प्रिय राहुल भाऊ, यावर माझ्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण मला खात्री नाही की मी करू शकेल, पण मी प्रयत्न करतोय, असं म्हणतक रोहित शर्माने राहुल द्रविडविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.माझ्या लहानपणापासून मी इतर कोट्यवधी लोकांप्रमाणेच तुमच्याकडे पाहिलं आहे पण मी तुमच्यासोबत जवळून काम केल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुम्ही या खेळाचे अतुलनीय दिग्गज आहात परंतु तुम्ही तुमची सर्व प्रशंसा आणि कृत्ये दारात सोडून आमच्या प्रशिक्षक म्हणून आत आलात. अशा स्तरावर आला आहात जिथे आम्हाला तुमच्याबद्दल काहीही बोलण्यास पुरेसे आरामदायक वाटलं होतं. तुमची देणगी, तुमची नम्रता आणि एवढ्या वेळानंतरही या खेळावरील तुमचं प्रेम कायम आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि प्रत्येक आठवण जपली जाईल, असं रोहित शर्मा म्हणाला आहे

माझी पत्नी तुला माझी 'वर्क वाईफ' म्हणून संबोधते आणि मी भाग्यवान आहे की मी तुला कॉल करू शकलो, असं रोहित शर्माने म्हटलं आहे. तुमच्या शस्त्रागारातून ही एकमेव गोष्ट गहाळ होती आणि मला खूप आनंद झाला की आम्ही ते एकत्र मिळवू शकलो. राहुल भाऊ, तुम्हाला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणायला मिळणे हा एक विशेष विशेषाधिकार आहे, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

2027 पर्यंत गंभीर राहणार टीम इंडियाचे कोच

इंडिया क्रिकेट टीमच्या कोचपादी गौतम गंभीर यांची साडेतीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते डिसेंबर 2027 पर्यंत भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. रोहित आणि द्रविड गेल्या तीन वर्षांपासून जवळून काम करत होते. या दोघांनी 2021 च्या T20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघ व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून आपला प्रवास सुरू केला.