आयपीएलची ट्रॉफीचं नाही तर 'हा' रेकॉर्ड देखील गुजरातसाठी ठरला खास

IPL 2022 च्या ट्रॉफीवर रविवारी गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपले नाव कोरले. 

Updated: May 30, 2022, 01:43 PM IST
 आयपीएलची ट्रॉफीचं नाही तर 'हा' रेकॉर्ड देखील गुजरातसाठी ठरला खास title=

मुंबई : IPL 2022 च्या ट्रॉफीवर रविवारी गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपले नाव कोरले. या विजयाने IPL च्या 15 व्या हंगामात पदार्पण करून ट्रॉफी जिंकणारा गुजरात पहिला संघ ठरलाय. गुजरातच्या या विजयात कर्णधार हार्दिक पंड्या (hardik pandya) आणि इतर खेळाडूंचे मोठे योगदान आहे. तसेच गुजरातचा हेड कोच आशिष नेहराचे योगदानही विसरता येणार नाही. कारण निव्वळ टीमला मार्गदर्शन नाही तर नेहराने मुख्य कोचची भूमिका बजावत हा एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.  

आयपीएलमध्ये अनेक भारतीय कर्णधारांनी ट्रॉफी जिंकली आहे, मात्र भारतीय कोच म्हणून एखाद्या संघाला ट्रॉफी जिंकून देण्याचा रेकॉर्ड या हंगामापूर्वी कोणत्याच कोचच्या नावे नव्हता. या 15 व्या हंगामात हा रेकॉर्ड आशिष नेहराने (ashish nehra) केला आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरातने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.  

आशिष नेहरा एकमेव भारतीय

आयपीएलमध्ये याआधीच्या 14 सीझनमध्ये सर्व मुख्य प्रशिक्षक परदेशी होते. ज्यामध्ये स्टीफन फ्लेमिंगने चार वेळा संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तर महेला जयवर्धनेने तीन वेळा हा पराक्रम केला. त्याचवेळी, ट्रेव्हर बेलिसने मुख्य प्रशिक्षक म्हणून दोनदा ट्रॉफी जिंकली. टॉम मूडी, रिकी पॉन्टिंग, जॉन राइट, डॅरेन लेहमन आणि शेन वॉर्न यांनी प्रत्येकी एकदा ट्रॉफी जिंकली. तर यावर्षी मुख्य प्रशिक्षक असलेल्या आशिष नेहराने गुजरातला ट्रॉफी जिंकून दिली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कोच ठरलाय. 

आशिष नेहराची प्रतिक्रिया 
विशेष म्हणजे आशिष नेहराला (ashish nehra) त्याच्या या रेकॉर्डबाबत पुसटशी कल्पनाही नव्हती. गुजरातने ज्यावेळेस ट्रॉफी जिंकली त्यावेळी हार्दिक पंड्याने आशिष नेहराला हा ट्रॉफी जिंकणारा तो पहिला भारतीय असल्याचे सांगितले.  असे काही घडले आहे हे मला माहीत नव्हते. मी अद्याप ट्रॉफीला हात लावलेला नाही आणि ही गोष्ट आयपीएल 2022 च्या ट्रॉफी सेलिब्रेशननंतर घडली आहे,अशी प्रतिक्रिया आशिष नेहराने दिली.