Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील आशिया कप 2022 (Asia Cup 2022)क्रिकेट स्पर्धेचा सुपर 4 सामना (भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप 2022) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याला प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या.
भारताकडून विराट कोहलीने (virat kohli) आपले अर्धशतक पूर्ण केले. 44 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकत विराट कोहलीने 60 धावा केल्या. त्याचवेळी गेल्या सामन्यात हिरो ठरलेल्या हार्दिक पांड्याला (hardik pandya) आज खातेही उघडता आले नाही. हार्दिकला मोहम्मद हसनैनने मोहम्मद नवाजच्या हाती झेलबाद केले. हार्दिक दोन चेंडू खेळूनही धावा न करता पॅव्हेलियनमध्ये परतला.
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही (rishabh pant) 14 धावा करून बाद झाला. डावाच्या 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला शादाब खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
All The Best @RishabhPant17 #RohitSharma #RishabPant #INDvsPAK pic.twitter.com/LwDu5sqInF
— (@Chiku2324) September 4, 2022
खराब शॉट्स खेळून पंत आणि हार्दिक बाद झाल्यावर कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये चांगलाच संतापलेला दिसला. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रोहित ड्रेसिंग रूममध्ये पंत आणि हार्दिकला फटकारताना दिसत आहे.
Captain Rohit Sharma wasn't happy with Rishabh Pant and Hardik Pandya's dismissals.
: Disney+Hotstar pic.twitter.com/k4QRm3RMpH
— CricTracker (@Cricketracker) September 4, 2022
दरम्यान, कर्णधार रोहितने 16 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.