Asia cup 2022: एशिया कप स्पर्धेत भारताचा आज हाँगकाँगशी (Honkong) सामना रंगतोय. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) जमा झाला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International) अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने 13 चेंडूत 21 धावा केल्या. याबरोबरच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावांचा टप्पा पूर्ण केला.
रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त म्हणजे 3520 धावा जमा झाल्या आहेत. टी-20 सामन्यात अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्माने 134 टी-20 सामन्यात 3520 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानंतर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा (New Zealand) सलामीवीर मार्टिन गप्टिलचा (Martin Guptill) नंबर लागतो.
3500 T20I runs and counting for Captain @ImRo45 #TeamIndia #INDvHK pic.twitter.com/ZUFlg9ObMd
— BCCI (@BCCI) August 31, 2022
हे खेळाडू आहे रोहितच्या मागे
मार्टिन गप्टिलच्या नावावर 3497 धावा जमा आहेत. यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3368 धावा केल्या आहेत. विराटने 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3000 धावा करणारा पहिला खेळाडू बनला होता.