मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या संदर्भात घोषणा केली. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ 28 ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत.
आशिया कपमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत गट सामने आणि त्यानंतर सुपर-4 च्या संघांचे सामने 3 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या कालावधीत होतील. तर आशिया कप 2022 चा अंतिम सामना रविवारी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आशिया कपमध्ये पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी (28 ऑगस्ट) आमने सामने येणार असून हा सामनाही दुबईत रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेची आता सर्वांना उत्सुकता लागलीय.