IND vs PAK : भारत-पाक सामन्याआधी स्टार बॉलर बाहेर, टीमचं टेन्शन वाढलं

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर 4 राउंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे.

Updated: Sep 3, 2022, 09:12 PM IST
IND vs PAK : भारत-पाक सामन्याआधी स्टार बॉलर बाहेर, टीमचं टेन्शन वाढलं title=

IND vs PAK, Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर 4 राउंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. उभयसंघ रविवारी (4 सप्टेंबर) भिडणार आहेत. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. एक वेगवान गोलंदाज या हायव्होल्टेज सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे हा टीमसाठी मोठा झटका आहे. (asia cup 2022 super 4 ind vs pak pakistaani faster bowler shahnawaz dahani ruled out against team india match due to injurey)

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani)  दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह अफ्रिदीलाही दुखापत झाली. त्यामुळे त्याला या स्पर्धेला मुकावं लागलं.  

पाकिस्तानला झटका

शाहीन अफरीदी आणि वसीम जूनियरच्या अनुपस्थितीत शाहनवाजवर पाकिस्तानच्या गोलंदाजीची जबाबदारी होती. मात्र आता तो स्वत:च बाहेर पडलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. शाहनवाजने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी केली होती. शाहनवाजने 6 बॉलमध्ये 2 सिक्सद्वारे 16 धावांची खेळी केली होती. तसेच 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या होत्या.

जाडेजाच्या जागी पटेलला संधी

दरम्यान टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जाडेदजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर झालाय. त्याच्या जागी ऑलराउंडर अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे.