Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022  उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. 

Updated: Aug 26, 2022, 03:21 PM IST
Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स  title=

मुंबई : IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022  उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. क्रिकेट मैदानवर यांच्यातील युद्ध पाहायला मिळणार आहे. हा शानदार सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती येणार आहेत, ज्यात भारतीय खेळाडूंच्या जीवनसाथी आणि प्रेयसींचा यात समावेश आहे. कोण स्टेडियममध्ये दिसणार ते जाणून घ्या.

हा सामना पाहण्यासाठी भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पोहोचू शकते. धनश्री वर्मा अनेक प्रसंगी युझवेंद्र चहल याला मैदानात प्रोत्साहन देताना दिसते. 

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक देखील दुबईमध्ये उपस्थित राहू शकते. नताशा स्टॅनकोविक देखील IPL- 2022 मधील प्रत्येक सामन्यात हार्दिक पांड्याला प्रोत्साहन देताना स्टेडियमवर दिसली आहे.

रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह नेहमीच त्याच्यासोबत असते. ती त्याला नेहमीत प्रोत्साहन देत असते. रितिका रोहित शर्मा याची मॅनेजर आहे, त्यामुळे ती हा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचू शकते. 

ऋषभ पंत याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हीसुद्धा अनेक प्रसंगी मैदानात दिसली आहे. या मोठ्या सामन्यात ऋषभ पंत याला प्रोत्साहन देण्यासाठी ईशा नेगी दुबईला पोहोचू जाऊ शकते.

विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत नेहमी प्रवास करत असते. खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, अशा परिस्थितीत अनुष्का शर्मा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी दुबईला जाऊ शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x