'निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे', रोहित शर्माच्या 'त्या' व्हिडीओनंतर चाहत्यांचा संताप

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आशिया चषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. असं असलं तरी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. 

Updated: Aug 26, 2022, 02:41 PM IST
'निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे', रोहित शर्माच्या 'त्या' व्हिडीओनंतर चाहत्यांचा संताप title=

Rohit Sharma Video: आशिया कप स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्यांची उत्सुकता लागली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन संघात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे सामन्यापूर्वी सोशल मीडियावर दोन्ही चाहते एकमेकांना भिडल्याचं दिसत आहे. दोन्ही संघाचे चाहते टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे उरली कसर सामन्याचा निकाल लागल्यानंतर काढली जाईल, असं दिसतंय. भारताने सर्वाधिक वेळा आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आशिया चषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. असं असलं तरी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. अशात भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

बीसीसीआयने अधिकृत ट्विटर खात्यावरून रोहित शर्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये तो स्केटिंग स्कूटर चालवताना दिसत आहे. यासोबत बीसीसीआयने लिहिले की, 'सरावानंतर रोहित शर्मा त्याच्या स्टाईलमध्ये फेरफटका मारताना दिसला.' काही चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. तर काही लोकांनी खास कारणावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'तुम्ही वर्षातून फक्त एक किंवा दोन सामने खेळता. जखमी होऊ नका. आता पंतला कर्णधार बनवण्याची वेळ आली आहे.' तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे.'

रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्‍याच्‍या नावावर टी-20 क्रिकेटमध्‍ये चार शतके आहेत. तो अवघ्या काही चेंडूंमध्ये सामना फिरवू शकतो. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला दमदार सुरुवात करून देण्यास नेहमीच यशस्वी ठरला आहे.