दुबई : भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतानं खलीलऐवजी जसप्रीत बुमराहला टीममध्ये घेतलं आहे. तर लोकेश राहुलला मात्र संधी देण्यात आलेली नाही. शार्दुल ठाकूरऐवजी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा 26 रननी विजय झाला होता. भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही मॅच गमावल्यामुळे हाँगकाँग याआधीच आशिया कपच्या बाहेर गेली आहे. तर भारत-पाकिस्तान सुपर-4 ग्रुपमध्ये आधीच क्वालिफाय झाले आहेत.
रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
फकर झमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शोएब मलिक, सरफराज अहमद, आसिफ अली, शादाब खान, फईम अश्रफ, मोहम्मद आमीर, हसन अली, उस्मान खान
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचे 12 सामने झाले आहेत. यापैकी 6 मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर 5 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक मॅच पावसामुळे झाली नाही.