मुंबई : आशिया कपसाठी (Asia cup) सोमवारी बीसीसीआय़ने (BCCI)संघ जाहीर केला. या संघात विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहूलची वापसी झालीय. विराट कोहली गेल्या अनेक वर्षापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याच्या बॅटीतून धावाच निघत नाहीयेत. त्यामुळे तो दिग्गजांच्या निशाण्यावर आहे. मात्र या दिग्गजांना आता सडेतोड उत्तर देण्याची संधी विराट कोहली जवळ आलीय. आशिया कपमध्ये विराटला एका विशेष रेकॉर्डला गवसणी घालण्याची संधी आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक वर्षापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. गेल्या अडिच वर्षापासून त्याच्या बॅटीतून एकही शतक आले नाहीये. त्यामुळे सतत त्याच्यावर टीका होतेय. अनेक सामन्यात त्याला संधी देऊन सुद्धा तो अपयशी ठरला होता. सततच्या अपयशी कामगिरीनंतर त्याला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरूद्ध सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्या दरम्यान तब्बल 41 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोहली भारतीय संघात पुनरागमन करत आहे.आशिया कपमध्ये तो मैदानात उतरताना दिसणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. या स्पर्धेतला पहिला सामना खेळताच विराट कोहली (Virat Kohli) एक मोठा विक्रम आपल्या नावे करणार आहे.
रेकॉर्ड काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टेस्ट, वनडे आणि टी20 सामन्यात 100-100 सामने खेळणारा तो आशियातील पहिला आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू बनणार आहे. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 99 सामने खेळले आहेत. जर त्याला पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाली तर हा त्याचा 100 वा टी-20 सामना असेल. अशाप्रकारे तो टेस्ट, वनडे प्रमाणे 100 टी20 सामना खेळून मोठा रेकॉर्ड करणार आहे. विशेष म्हणजे कोहलीच्या बॅटीतून या सामन्यात धावा होतात की नाही हे माहित नाही. पण हा सामना खेळून तो मोठा विक्रम नावे करणार आहे.
असा विक्रम करणारा दुसरा खेळाडू
कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टेस्ट, वनडे आणि टी20 सामन्यात 100-100 सामने खेळणारा तो जगातील दुसरा खेळाडू बनणार आहे. सध्या हा विक्रम न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरच्या नावावर आहे. टेलरने 112 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 102 टी-20 सामने खेळले आहेत.
शतकाचा दुष्काळ संपेना
कोहलीला गेल्या पाच महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक आणि अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. तो सातत्याने धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. कोहलीने यावर्षी 17 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने केवळ 17 धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर कोहलीने 6 आंतरराष्ट्रीय डावात केवळ 76 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता थंड पडलेली विराटची बॅट आशिया कपमध्ये चालते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.