IND vs AUS : भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कांगारू गडगडले; टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सचं आव्हान

ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम अवघ्या 188 रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सची आवश्यकता आहे. 

Updated: Mar 17, 2023, 05:02 PM IST
IND vs AUS : भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कांगारू गडगडले; टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सचं आव्हान title=

India vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये आज पहिली वनडे खेळवण्यात येतेय. पहिल्याच वनडे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारूंच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम अवघ्या 188 रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सची आवश्यकता आहे. 

188 रन्सवर ऑलआऊट झाली ऑस्ट्रेलिया टीम

मुंबईच्या वानखेडे स्टेडिययमध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय टीम इंडियासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेली ऑस्ट्रेलिया टीम 35.4 ओव्हरमध्ये 188 रन्स केले. भारताच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची टीम पत्त्यांप्रमाणे ढेपाळली. 

मिचेल मार्शची उत्तम खेळी

ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून केवळ मिचेल मार्शला चांगली खेळी करता आली. त्याने 65 बॉल्समध्ये 81 रन्सची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 6 ओव्हर्समध्ये केवळ 17 रन्स खर्च केले. यावेळी 2.83 च्या इकानॉमीने 3 विकेट्स देखील काढले असून 2 मेडन ओव्हर फेकल्या. शमी शिवाय मोहम्मद सिराजने देखील 3 विकेट्स घेतले. रविंद्र जडेजा 2, हार्दिक आणि कुलदीपने 1-1 विकेट्स घेतल्यात.

वनडेसाठी टीम इंडिया

टीम इंडिया इलेव्हन : शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबोट, मिचेल स्टार्क आणि एडम झंपा.