Australia vs India : कर्णधार विराटवर गौतम गंभीर नाराज, म्हणला...

मला हे कळत नाही की.....

Updated: Nov 30, 2020, 04:00 PM IST
Australia vs India : कर्णधार विराटवर गौतम गंभीर नाराज, म्हणला...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Team India भारतीय संघ Australia ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यापासूनच या संघातील खेळाडू पाहता क्रीडा रसिकांनी दमदार कामगिरीची अपेक्षा केली होती. पण, एकदिवसीय सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात झाली आणि संघाची सातत्यानं होणारी पडझड समोर आली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियानं भारतीय क्रिकेट संघाचा पराभव केला. तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं अगदी सहजपणे खिशात टाकली. 

भारतीय गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं धावांचा डोंगर उभा केला. ज्यानंतर आता संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या virat kohli विराट कोहली याच्यावर अनेकांनीच निशाणा साधला आहे. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू gautam gambhir गौतम गंभीर याचाही समावेश आहे. विराट संघाचं नेतृत्त्वं करण्यात अपयशी ठरला असंच त्याचं मत आहे. 

'प्रामाणिकपणे सांगावं तर, मला कर्णधाराची भूमिकाच समजलेली नाही. आपण गडी बाद करणं किती महत्त्वाचं आहे याबाबतच बोलत होतो. तुम्हाला अशी तुफानी फलंदाजांची फळी थांबवायची असेल तर, तुम्हाला तुमच्या प्रिमीयर गोलंदाजाला दोन षटकं टाकायला देता', असं गौतम ESPNCricinfo वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसला. 

 

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये गोलंदाजीच्या निर्णयावर प्रकाश टाकत सहसा गोलंदाजाला 4-3-3 अशा अंतरानं त्याची 10 षटकं टाकू दिली जातात. किंवा जास्तीत जास्त चार षटकं टाकू दिली जातात हे त्यानं स्पष्ट केलं. 'पण जर तुम्ही, वेगवान गोलंदाजाला नव्या चेंडूनं फक्त दोनच षटकं टाकून थांबवता, तर मला या कर्णधाराच्या भूमिकेबाबतच काहीच कळत नाही आहे किंबहुना मी ती विस्तृतपणे मांडूही शकत नाही', असं गंभीर म्हणाला. 

हे काही टी20 क्रिकेट नाही, असं म्हणत त्यानं विराटच्या नेतृत्त्वावरच नाराजी व्यक्त केली. वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे यांनाही संघाकडून संधी देता आली असती, असं म्हणत त्यानं संघाच्या आणि कर्णधार कोहलीच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.