INDvsAUS: ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये तीन बदल

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आहे.

Updated: Feb 27, 2019, 06:46 PM IST
INDvsAUS: ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये तीन बदल title=

बंगळुरू : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचनं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टी-२०मध्ये पराभव झाल्यानंतर आता भारतानं या मॅचमध्ये तीन बदल केले आहेत. मयंक मार्कंडेच्याऐवजी विजय शंकर आणि उमेश यादवच्या ऐवजी सिद्धार्थ कौलची निवड करण्यात आली आहे. तर रोहित शर्माऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा निसटता पराभव झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या २ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सीरिज बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं बंधनकारक आहे. ही मॅच जिंकून सीरिज १-१ ने बरोबरीत करायचा भारताचा मानस असेल. ऑस्ट्रेलिया टीमला आतापर्यंत भारतात टी-२० सीरिज जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही कामगिरी करण्याची संधी देखील ऑस्ट्रेलियाला आहे.

पहिल्या टी-२०मध्ये विजयासाठी १२७ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. १२७ रनचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या भारतीय बॉलरनी नाकी नऊ आणले. जसप्रीत बुमराहनं ४ ओव्हरमध्ये फक्त १६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना आऊट केलं. शेवटच्या २ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६ रनची गरज होती. पण १९व्या ओव्हरमध्ये बुमराहनं फक्त २ रन दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची गरज होती, पण उमेश यादवला ऑस्ट्रेलियाला रोखता आलं नाही.

भारतीय टीम

शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, विजय शंकर, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल

ऑस्ट्रेलियाची टीम

डीआर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, एरॉन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, एश्टन टर्नर, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स, जाय रिचर्डसन, जेसन बेहरेनड्रॉफ, एडम झम्पा

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा