मुंबई : बीसीसीआयने (Bcci) टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने संघात एकूण 18 जणांचा समावेश केलाय. यापैकी 3 जणांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही. त्यामुळे शार्दुल समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (bcci again not give chance to shardul thakur for t20 world 2022 netizens angry on social media)
शार्दुलचा 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र यंदा शार्दुलला मुख्य संघात संधी देण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्याला संधी न दिल्याने क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झालाय.
शार्दुलमध्ये बॉलिंगसह निर्णायक क्षणी बॅटिंग करण्याची क्षमता आहे. त्याने स्वत:ला वेळोवेळी सिद्ध करुन दाखवलंय. शार्दुलने आतापर्यंत जेव्हा जेव्हा टीम इंडियाला विकेट्सची गरज होती, तेव्हा तेव्हा त्याने सलग 2 विकेट्स काढून दिले. मात्र त्याला वगळल्याने शार्दुलच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केलीय.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग. स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.