मुंबई : साऊथ आफ्रिका दौ-यासाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
बीसीसीआयने साऊथ आफ्रिका दौ-यासाठी वनडे टीमची घोषणा केली आहे. यात मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया साऊथ आफ्रिकेत सहा वनडे सामने खेळणार आहे. सीरिजचा पहिला सामना १ फेब्रुवारीला किंग्समीड डरबन येथे खेळला जाणार आहे.
यात विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे.
The All India Senior Selection Committee met in Mumbai to select the Indian team for the 6-match ODI series against South Africa #TeamIndia pic.twitter.com/szbbC6l3MU
— BCCI (@BCCI) December 23, 2017
टीम इंडियाचं नेतृत्व विराट कोहलीच्या हाती आहे. १७ सदस्यीय टीममध्ये चार गोलंदाज आहेत. अक्षर पटेल. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल स्पीन गोलंदाज आहे. केदार जाधवची वापसी झाली आहे. तर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डाव्या हाताचा स्पिनर रविंद्र जडेजा यांना पुन्हा टीम बाहेर ठेवण्यात आलं आहे. सलामी फलंदाज केएल राहुल, आणि उमेश यादवही टीममध्ये जागा मिळवू शकले नाही.
साऊथ आफ्रिकेचा हा दौरा टीम इंडियासाठी आव्हानात्मक मानला जात आहे. साऊथ आफ्रिकेतील पिचवर टीम इंडियाच्या फलंदाजीची परीक्षा होणार आहे. या दौ-यात टेस्ट सीरिजला ५ जानेवारीला केपटाऊनमध्ये सुरूवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत त्यांना तीन टेस्ट, सहा वनडे आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहे. लागोपाठ एकतर्फ़ी मिळालेले विजय दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी चांगली तयारी नक्कीच म्हटले जाणार नाहीत.