मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka Upcoming Series) यांच्यात कसोटी आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने (Bcci) यासह टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधाराचीही घोषणा केली आहे. श्रीलंका विरुद्धच्या या कसोटी मालिकेपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. (bcci announced team india 18 member squad for upcoming t 2oi and test series rohit sharma appointed test team captain)
कॅप्टन रोहित शर्मा
बीसीसीआयने 'हिटमॅन' रोहित शर्माची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होतं. दरम्यान आता रोहित शर्मा कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
जसप्रीत बुमराह उपकर्णधार
बीसीसीआयने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि टेस्ट सीरिजसाठी यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता बुमराह बॉलिंग ग्रृपच्या नेतृत्वासह वाईस कॅप्टन्सीही करताना दिसणार आहे.
पंत-विराटला विश्रांती
दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला विश्रांती दिली आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून तिन्ही फॉर्मेटमध्ये सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे या दोघांना बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.
पुजारा-रहाणेला डच्चू
बीसीसीआयने श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला डच्चू दिला आहे. हे दोन्ही अनुभवी खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहेत. याच कामगिरीचा फटका या दोघांना बसला आहे. या दोघांना आता पुन्हा कमबॅक करण्यासाठी रणजी ट्रॉफीमध्ये स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.
NEWS - The All-India Senior Selection Committee has picked an 18-member squad for the upcoming Paytm T20I and Test series against Sri Lanka. Team India are set to play three T20Is in Lucknow and Dharamsala and two Tests in Mohali and Bengaluru respectively.@Paytm #INDvSL
— BCCI (@BCCI) February 19, 2022