मुंबई : आयपीएलपाठोपाठ आता रणजी ट्रॉफीसंदर्भात एक मोठी अपडेट येत आहे. IPL पूर्वी रणजी ट्रॉफी खेळवण्याचा विचार सुरू आहे. दोन टप्प्यामध्ये रणजी ट्रॉफी खेळवली जाणार असल्याची माहिती BCCI च्या सूत्रांनी दिली आहे. दोन टप्प्यात स्पर्धा होणार हे निश्चित आहे. आता या स्पर्धेच्या तारखा समोर आल्या आहेत.
सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय 13 फेब्रुवारीपासून रणजी स्पर्धा खेळवण्याच्या विचारात आहे. IPL 2022 पूर्वी रणजी क्रिकेट सामने पूर्ण करण्याचा BCCI चा मानस आहे. फॉरमॅटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. 5 गटांमध्ये खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक गटामध्ये 6 संघ असणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये रणजी करंडक सुरू करण्याचा विचारात आहेत. 13 फेब्रुवारीपासून रणजी ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा एक महिन्याचा असेल जो आयपीएल 2022 पूर्वी खेळवण्यात येणार आहे.
रणजी ट्रॉफीचे सामने मुंबई, बेंगलुरू, अहमदाबाद, कोलकाता, तिरूवनंतपुरम आणि चेन्नई इथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर नॉकआऊट सामने कोलकातामध्ये होणार आहेत. कोलकाताला पर्याय बंगळुरू ठेवण्यात आला आहे.