मुंबई : क्रिकेटमध्ये (Cricket) स्पर्धा प्रचंड वाढत आहे. भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आतापर्यंत अनेक खेळाडू टीम इंडियात आले. पण टीममध्ये जागा निश्चित करणं खूप कमी लोकांना जमलं. अनेक जण फीटनेसमुळे भारतीय संघातून बाहेर झाले. ज्यामुळे पुन्हा त्यांना कमबॅक करता आलं नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अहवालानुसार, विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वात फीट भारतीय क्रिकेटपटू असल्याचं पुढे आलं आहे.
बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी तयार केलेल्या या अहवालात एनसीएने केलेल्या कामाचा आणि मागील सत्राचा तपशील देण्यात आला आहे. अहवालानुसार, 'या कालावधीत NCA वैद्यकीय पथकाने 70 खेळाडूंच्या दुखापतींवर उपचार केले'. या 70 खेळाडूंपैकी 23 भारतीय संघातील, 25 भारत A/उभरते खेळाडू, एक भारतीय U-19 संघातील, सात वरिष्ठ महिला संघातील आणि 14 विविध राज्यांतील खेळाडू आहेत.
विराट कोहली जगातील सर्वोत्तम फिट (Virat Kohli Fitness) खेळाडूंपैकी एक मानला जातो. तो त्याच्या फिटनेसवर जितकी मेहनत घेतो तितकी मेहनत अजून तरी कोणी भारतीय खेळाडूने घेतलेली दिसत नाही. फिटनेसमुळे विराटला (Virat) एखाद्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले असेल असे क्वचितच घडले असेल. विराट कोहलीची जेव्हा भारतीय संघात (Team india) निवड झाली तेव्हा सुरुवातीला तो तसा नव्हता. पण नंतर त्याने फिटनेसवर अधिक काळजी घेतली. फिटनेसबाबत तो अप्रतिम आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघातील खेळाडूंनाही त्यांच्या तंदुरुस्तीची प्रचंड क्रेज होती. तो संघातील खेळाडूंना देखील फीट राहण्याच्या सूचना करत असे.
आयपीएलमध्ये (IPL) देखील त्याने त्याच्या संघातील खेळाडूंना फिटनेस नसेल तर संघात स्थान मिळणार नाही. हे दाखवून दिलं होतं. विराट कोहली स्वत: फिटनेसच्या बाबतीत मोठी काळजी घेतो. तो त्याचे फिटनेसबाबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर करत असतो.
विराट कोहलीने (Virat Kohil fit) एकट्याने अनेक सामन्यात चांगली खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. अनेकदा त्याने एकांकी झुंज दिली आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप (T20 World cup 2022) खेळणार आहे. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आला असून टीम इंडियाला (Indian Team) या स्पर्धेत त्याच्याकडून खूप आशा असणार आहेत.