Umran Malik आधी टीम इंडियात होता सर्वांत वेगवान गोलंदाज,अस संपलं करिअर

उमरानं सारख्या घातक बॉलरचं 4 वर्षात संपलं करिअर, पाहा कोण तो खेळाडू

Updated: Jul 31, 2022, 03:22 PM IST
Umran Malik आधी टीम इंडियात होता सर्वांत वेगवान गोलंदाज,अस संपलं करिअर   title=

मुंबई : टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची क्रिकेट विश्वात खुप चर्चा आहे. आयपीएलमधून सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून तो नावारूपास आला होता. तसेच तो शोएब अख्तरचा फास्ट ब़ॉलिंगचा रेकॉर्ड तोडू शकतो अशीही चर्चा आहे. एकीकडे उमरानला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात असतानाच, दुसरीकडे मात्र उमरानच्या आधी टीम इँडियाकडे एक वेगवान गोलंदाज होता. मात्र 4 वर्षातच त्याचं करीअर संपलं. त्यामुळे हा खेळाडू कोण होता व त्याचं करिअर का संपलं ते जाणून घेऊयात.  

उमरान मलिक आधी भारताला एक असा वेगवान गोलंदाज सापडला होता, ज्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने जगाला चकित केले होते.हा खेळाडू दुसरा कोणी नसून वरुण आरोन होता. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आरोन ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने बॉल फेकायचा. त्यामुळेच त्याला टीम इंडियात प्रवेश मिळाला होता. 

अॅरॉनला वयाच्या १५ व्या वर्षी टॅलेंट स्काउटमधून ओळख मिळाली, त्यानंतर त्याची प्रतिभा पाहून तेथील प्रशिक्षकाने त्याला चेन्नईच्या एमआरएफ पेस अकादमीमध्ये पाठवले. अॅरॉनची ब़़ॉलिंग पाहून डेनिस लिली देखील खूप प्रभावित झाले होते. पेस अकादमीमध्ये अॅरॉनची गोलंदाजी सुधारण्यात आली. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियात झालेल्या इमर्जिंग प्लेयर्स स्पर्धेत वरुणच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. या स्पर्धेतील त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळेच अॅरॉनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

विजय हजारे ट्रॉफीत फेकला फास्ट ब़ॉल 
2010-22 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण अॅरॉन आपल्या गोलंदाजीने प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी ठरला होता. यादरम्यान, गुजरातविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ताशी 153 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला, ज्यामुळे तो भारतीय निवडकर्त्यांच्या नजरेत आला होता.

2011 मध्ये पदार्पण 
वेगवान गोलंदाज वरुणला 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या वानखेडे कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी वरुणला एकदिवसीय सामन्यातही इंग्लंडविरुद्ध पदार्पण सामना खेळण्याची संधी मिळाली. 2014 मध्ये अरुणला इंग्लंडच्या दौऱ्यावरही नेण्यात आले होते. फार कमी वेळात त्याची वेगवान गोलंदाजी पाहून निवडकर्त्यांनी त्याला वरिष्ठ संघात स्थान दिले.

'या' कारणामुळे संघाबाहेर
वरुण अॅरॉनला त्याच्या छोट्या कारकिर्दीत अनेक दुखापती झाल्या, ज्यामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आली. दुखापतीमुळे अॅरॉनचा वेगवान गोलंदाजीचा वेग डगमगत होता.  एकेकाळी फास्ट बॉलिंगने प्रतिस्पर्धी फलंदाजांचा घाम काढणारा अॅऱ़ॉनला दुखापतीमुळे तितक्या वेगाने गोलंदाजी करता येत नव्हती. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या दुखापतीमुळे वरुणला भारतीय संघात सातत्याने भाग घेता आला नाही आणि याच कारणामुळे तो 2015 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळल्यापासून तो संघाबाहेर आहे.

कारकीर्द 
वरुण अॅरॉनने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आतापर्यंत 167 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर T20 मध्ये 89 विकेट्स आहेत. त्याच वेळी, भारतासाठी अॅरॉनने 9 कसोटी सामन्यात 18 विकेट घेतल्या, तर एकदिवसीय सामन्यात 11 विकेट घेतल्या. आता अॅरॉनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपली आहे. त्याला संघात येणे अवघड आहे.