पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा ५९ रननी विजय झाला. विराट कोहलीचं शतक, श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या ४ विकेटमुळे भारताने ३ मॅचच्या या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली. पहिली वनडे मॅच पावसामुळे रद्द झाली होती. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये २७९ रन केल्या.
२८० रनचा पाठलाग करायला आलेल्या वेस्ट इंडिजला भुवनेश्वर कुमारने सुरुवातीलाच धक्का दिला. आपली ३००वी मॅच खेळणारा क्रिस गेल ११ रनवर एलबीडब्ल्यू झाला. भुवनेश्वरने आपली दुसरी शिकार निकोलास पूरनला केलं. ४२ रनवर निकोलास पूरन माघारी परतला.
भुवनेश्वर कुमारने रोस्टन चेसला १८ रनवर आऊट केलं. आपल्याच बॉलिंगवर भुवनेश्वर कुमारने रोस्टन चेसचा अफलातून कॅच पकडला. बॉलिंग करत असताना भुवनेश्वरने डाव्या बाजूला उडी मारून कॅच पकडला.
What a catch by #bhuvi @BhuviOfficial @BCCI pic.twitter.com/t9aHZBqMx3
— Prasad prabhudesai (@Prasadprabhude2) August 11, 2019
रोस्टन चेसची विकेट घेतल्यानंतर भुवनेश्वर कुमारने केमार रोचला शून्यवर बोल्ड केलं. भुवनेश्वरने ८ ओव्हरमध्ये ३१ रन देऊन ४ विकेट घेतल्या.
'डॉट बॉल टाकून वेस्ट इंडिजच्या टीमवर दबाव बनवण्याची आमची रणनिती होती. मी निकालाबाबत जास्त विचार करत नाही. आम्ही एक-दोन विकेट घेतल्या तर मॅचमध्ये पुनरागमन करू असा विश्वास होता. मी फक्त रन न द्यायचा विचार करून बॉलिंग केली. पूरनची विकेट महत्त्वाची होती आणि रोस्टन चेसचीही. रोस्टन चेस सारखा स्ट्राईक बदलत होता.', असं भुवनेश्वरने मॅच संपल्यानंतर सांगितलं.