हे रेकॉर्ड करणारा भुवनेश्वर पहिला भारतीय! सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 19, 2018, 09:34 PM IST
हे रेकॉर्ड करणारा भुवनेश्वर पहिला भारतीय! सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा शानदार विजय झाला. दक्षिण आफ्रिकेच्या ५ विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. याचबरोबर भुवनेश्वर कुमारनं कोणत्याही भारतीय बॉलरला जमलं नाही ते रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाच विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय बॉलर ठरला आहे. तर हे रेकॉर्ड करणारा भुवनेश्वर कुमार सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. भुवनेश्वर कुमारनं टेस्टमध्ये ४, वनडेमध्ये १ आणि टी-20मध्ये १ वेळा भुवनेश्वरनं ५ विकेट घेतल्या आहेत.

इमरान ताहीर

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज लेग स्पिनर इमरान ताहीरनं टेस्टमध्ये २ वेळा, वनडेमध्ये २ वेळा आणि टी-20मध्ये १ वेळा ५ विकेट घेतल्या आहेत.

लसीथ मलिंगा

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगानं टेस्टमध्ये ३ वेळा, वनडेमध्ये ७ वेळा आणि टी-20मध्ये १वेळा ५ विकेट घेतल्या.

अजंता मेंडिस

श्रीलंकेचा स्पिनर अजंता मेंडिसनं टेस्टमध्ये ४ वेळा, वनडेमध्ये ३ वेळा आणि टी-20मध्ये २ वेळा ५ विकेट घेतल्या.

टीम साऊदी

न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीनं टेस्टमध्ये ६ वेळा, वनडेमध्ये २ वेळा आणि टी-20मध्ये १ वेळा ५ विकेट घेतल्या.

उमर गुल

पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुलनं टेस्टमध्ये ४ वेळा, वनडेमध्ये २ वेळा आणि टी-20मध्ये २ वेळा ५ विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे.