WTC Points Table: भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली टेस्ट सिरीज अखेर ड्रॉ झाली. पहिल्या सामन्यात झालेला मानहानी पराभवाचा बदला अखेर टीम इंडियाने घेतला. दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने पराभव केला. या विजयाच्या जोरावर टीम इंडियाने केपटाऊनमध्ये इतिहास रचला. या सिरीजसोबत पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील टेस्ट सिरीज खेळवली जातेय. दोन्ही सिरीज संपल्यानंतर WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. टीमच्या क्रमवारीत बदल होणार असून कोणती टीम अंतिम फेरीत पोहोचू शकतो, याचं चित्रंही स्पष्ट होऊ शकणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या टेस्टमध्ये दमदार कमबॅक करत सिरीज 1-1 अशी ड्रॉ केली. भारताच्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या चित्र पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. भारत 4 सामन्यांत 2 विजय, 1 पराभव आणि 1 अनिर्णित अशा 26 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यावेळी टीम इंडियाचा पीसीटी 54.16 आहे.
टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत फक्त 2 टेस्ट खेळल्या आहेत. ज्यामध्ये 1 पराभव आणि 1 विजयासह 12 गुण आहेत. भारताच्या विजयाचा फटका पाकिस्तानला काही प्रमाणात बसला असून पाकची टीम 6 व्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाने पहिल्या पराभवाचा बदला घेतला. केपटाऊनमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. दुसरा टेस्ट सामना अवघ्या दीड दिवसांत संपला. या सामन्यात केवळ 107 ओव्हर्स फेकण्यात आले. संपूर्ण टेस्ट सामन्यात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आलं. मुख्य म्हणजे पहिल्याच दिवशी 23 विकेट पडल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिवशीही 10 विकेट पडल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्स राखून पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंदवला.