झहीरच्या Wedding Party मध्ये विराटनं अनुष्कासोबत असं काही केलं की....

त्याचं हे रुप पाहून अनुष्कालाही ....

Updated: Jul 2, 2021, 03:23 PM IST
झहीरच्या Wedding Party मध्ये विराटनं अनुष्कासोबत असं काही केलं की....
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा चर्चेत येण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. एखादा फोटो असो किंवा मग व्हिडीओ, विराटनं पोस्ट केली आणि चर्चा झाली नाही असं फार क्वचितच घडतं. सध्या क्रीडा जगतातील हा लोकप्रिय चेहरा पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा विराटचा नवा फोटो आणि त्यामध्ये पाहायला मिळत असणारा त्याचा अंदाज. 

भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या विवाहसोहळ्यात विराटनं एकच कल्ला केला होता. त्याच क्षणांचे Unseen Photos इन्स्टाग्रामवर 'विरुष्का डेस्टिनी' या पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. 

Video : युजवेंद्र चहलच्या पत्नीची अदाकारी पाहून नेटकरी म्हणतात 'लय भारी'

 

इथं विराट चक्क अनुष्काची ओढणी हातात घेऊन मनमुराद नाचताना दिसत आहे. त्याचं हे रुप पाहून अनुष्कालाही हसू आवरलेलं नाही हेच या फोटोतून दिसत आहे. विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. त्यातच आता या फोटोची भर पडताना दिसत आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या एका वेगळ्या भूमिकेत आहेत. ही भूमिका आहे पालकत्त्वाची. काही महिन्यांपूर्वीच अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. विरुष्कानं त्यांच्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं. वामिकाच्या जन्मानंतर चाहते आणि क्रीडारसिकांनी या सेलिब्रिटी जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. सोबतच चिमुरडीची पहिली झलक पाहण्यासाठीही चाहते उत्सुक दिसले. पण, विराट आणि अनुष्का या दोघांपैकी कोणीही अद्यापही कुठेच त्यांच्या मुलीचा फोटो पोस्ट केला नाही शिवाय कोणत्याही प्लॅटफॉर्मवरही हा फोटो त्यांनी पोस्ट होऊ दिलेला नाही. त्यांच्या या निर्णयाचंही फॉलोअर्सनी स्वागतच केलं आहे.