मोठी बातमी! भारतीय गोलंदाजाच्या आईचं कोरोनामुळे निधन

भारताच्या वर्ल्डकप विजयात मोठा वाटा असलेल्या या गोलंदाजाच्या आईचं कोरोनानं निधन

Updated: Apr 14, 2021, 05:13 PM IST
मोठी बातमी! भारतीय गोलंदाजाच्या आईचं कोरोनामुळे निधन

मुंबई: देशात कोरोनाचा धोका वाढत असतानाच क्रिकेट आणि मनोरंजन विश्वावर मोठं संकट आलं आहे. नुकतंच दिल्ली कॅपिटल्स संघातील एक स्टार गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यापाठोपाठ आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्पिनर गोलंदाजाच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 

2020मध्ये अंडर-19मध्ये भारताला वर्ल्डकप मिळवून देण्यात मोठा वाटा असलेल्या या गोलंदाजानं आपल्या आईला कोरोनामुळे गमवलं आहे. स्पिनर हरमीत सिंहची आई परमजीत कौर यांचं कोरोनामुळे निधन झालं. 

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार हरमीत राजस्थान रॉयल्स संघाकडून IPL देखील खेळला होता. त्याने इन्टावर इंजेक्शनचा फोटो शेअर करून आईच्या निधनाची बातमी दिली आहे. 

क्रिकेट विश्वात सध्या IPLवर कोरोनाचं मोठं संकट आहे. एकामागोमाग एक खेळाडू आणि ग्राऊंड स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्यानं काहीशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर वानखेडे स्टेडियमवर लॉकडाऊनचा परिणाम होणार नसल्याचंही सांगितलं जात आहे. 

नुकताच देवदत्ता पडिक्कलने कोरोनावर मात केली. अक्षर पटेलनंही कोरोनावर मात केली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूला कोरोना झाल्यानं ऋषभ पंतचं टेन्शन थोडं वाढलं आहे.