बीजिंग : जखम कितीही मोठी असो...आजार कितीही गंभीर असो... तरीही एखाद्या व्यक्तीने त्याचं ध्येय साध्य करणं याहून कोणतीही गोष्ट मोठी नाही. याच आपल्या सर्वांना माहित असलेलं एक उदाहरण म्हणजे क्रिकेटर युवराज सिंग. कॅन्सरसारखा गंभीर आजारंही त्याचा ध्येय तोडू शकला नाही. त्याने आधी कॅन्सरला हरवलं आणि त्यानंतर तो मैदानात परतला. असाच उत्साह कॅनेडियन स्नोबोर्डिंग खेळाडू मॅक्स पॅरटनेही दाखवला.
मॅक्स पॅरोट पहिलं कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली त्यानंतर बीजिंगच्या विंटर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं. विंटर ऑलिंपिक स्नोबोर्डिंग स्पर्धेत पुरुषांच्या स्लोपस्टाईल प्रकारात गोल्ड जिंकून पॅरटने कमबॅकचा आनंद साजरा केलाय.
पॅरटच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची दुसरी जंप. जेव्हा तो दुसऱ्या किकरवर (रॅम्प) पोहोचला तेव्हा सरळ जाण्याऐवजी तो एका ठिकाणी वळला आणि तिथे पोहोचला. असं कऱणारा तो एकमेव सहभागी होता. त्यानंतर तो मागे झुकला आणि 1440 अंशांची स्पिन घेत लँडिंग केलं.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर पॅरोटने सांगितलं की, माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे. प्योंगचांग ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर पॅरोटला हॉजकिन लिम्फोमा हा कॅन्सर झाल्याचं निदान करण्यात आलं. यानंतर त्याला 6 महिन्यांत 12 वेळा केमोथेरपी घ्यावी लागली.
पॅरोट पुढे सांगतो की, या आजाराशी लढण्यासाठी मला सर्वस्वाचा त्याग करावा लागला. मी पहिल्यांदाच माझा स्नोबोर्ड कपाटात बंद केला होता. त्यावेळी मला सिंहाला पिंजऱ्यात बंद केल्यासारखं वाटलं. या स्पर्धेत चीनच्या यू यिमिंगने रौप्य तर कॅनडाच्या मार्क मॅकमॉरिसने कांस्यपदक जिंकलंय.