मैदानवरच रोहित शर्मा संतापला! चहलवर रोहितचा राग अनावर; पाहा व्हिडीओ

दुसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माचं एक वेगळं रूप पहायला मिळालं. यावेळी रोहित शर्मा टीममधील एका खेळाडूवर चांगलाच भडकलेला दिसला.

Updated: Feb 10, 2022, 07:52 AM IST
मैदानवरच रोहित शर्मा संतापला! चहलवर रोहितचा राग अनावर; पाहा व्हिडीओ title=

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरोधातील तीन वनडे सामन्यांची सिरीज 2-0 अशा फरकाने जिंकली. या सिरीजमधील अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. अशा पद्धतीने रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक चांगली सुरुवात केली आहे. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माचं एक वेगळं रूप पहायला मिळालं. यावेळी रोहित शर्मा टीममधील एका खेळाडूवर चांगलाच भडकलेला दिसला.

चहलवर भडकला रोहित

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या वनडे सामन्यात राग अनावर झाला होता. वेस्टइंडिज फलंदाजी करत असताना 45 व्या ओव्हरमध्ये रोहितने वॉशिंगटन सुंदरला गोलंदाजी दिली. यावेळी युजवेंद्र चहल मिड ऑफ पर फील्डिंग करत होता. रोहितने चहलला लाँग ऑफवर परत जाण्यास सांगतलं पण तो सुस्तील दिसला. या प्रकरणाचा रोहितला खूप राग आला आणि त्याने चहलला भर मैदानात झापलं.

रोहितने चहलला ओरडून लाँग ऑफवर जाण्यास सांगितलं. रोहितने चहलला फटकारले आणि म्हणाला, 'परत जा, तू पळून का जात नाहीयेस? चला तिकडे जा.' यानंतर चहल पुन्हा मागे गेला. 

रोहितचा असा फॉर्म पहिल्यांदाच मैदानावर पाहायला मिळाला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित चहलवर ओरडताना स्पष्टपणे ऐकू येतंय.

टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 238 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर विंडिज 46 षटकांमध्येच 193 धावांवर ऑलआऊट झाली.