IND vs SL: जसप्रीत बुमराहला झालंय तरी काय?, कॅप्टन रोहितच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली!

India vs Sri Lanka, 1st ODI:रोहित शर्मा (Rohit Sharma Press Conference) पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. त्यावेळी त्याने बुमराहवर भाष्य केलं. जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) दुर्दैवी घटना घडली, असं तो म्हणालाय.

Updated: Jan 10, 2023, 01:24 AM IST
IND vs SL: जसप्रीत बुमराहला झालंय तरी काय?, कॅप्टन रोहितच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली! title=
jasprit bumrah, rohit sharma

Rohit Sharma On Jasprit Bumrah:  टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आगामी 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला (India Cricket team) मोठा धक्का बसला आहे. बुमराहला काही वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय. अशातच आता कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) चिंताजनक अपडेट दिली आहे.

उद्यापासून भारतविरूद्ध श्रीलंका यांच्यामधील वनडे सिरीजला (India vs Sri Lanka, 1st ODI) सुरुवात होणार आहे. त्याआधी रोहित शर्मा (Rohit Sharma Press Conference) पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. त्यावेळी त्याने बुमराहवर भाष्य केलं. जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) दुर्दैवी घटना घडली. जसप्रीत बुमराह एनसीएमध्ये खूप मेहनत करत होता. जेव्हा जसप्रीत बुमराहने पूर्ण फिटनेस परत मिळवला होता, जेव्हा जसप्रीत बुमराहने पूर्ण मेहनत घेऊन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा गेल्या दोन दिवसांत मला वाटतं की त्याच्या पाठीत दुखणं जाणवत होतं, असं रोहित म्हणालाय.

आणखी वाचा - दुखापत की आणखी काही? Jasprit Bumrah ला सिरीजबाहेर काढण्याचं नेमकं कारण काय?

बुमराहचं हे जरा छोटं दुखणं आहे, मग बुमराह काही बोलतो तेव्हा तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. आम्ही तेच केलं, मला वाटतं की तेव्हा त्याला न खेळवण्याचा निर्णय घेणं खूप महत्वाचं होता, असंही रोहित (Rohit Sharma On Jasprit Bumrah) म्हणाला आहे.

दरम्यान, सर्वात चिंतेची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहने NCA मधील सत्रादरम्यान पुन्हा एकदा 'पाठीत जडपणा' असल्याची तक्रार केली, त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर आता तो (Jasprit Bumrah Fitness Update) पुर्णपणे फिट नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआय वेळोवेळी ब्रेक देणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.