दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही. 

Updated: Jun 9, 2017, 07:32 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर  title=

 लंडन :  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही. 
 
 या सामन्यापूर्वी डिव्हिलिअर्सला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. स्नायूला दुखापत झाल्याने तो सध्या इलाज घेत आहे. 
 
 येत्या रविवारी किंग्सटन ओव्हल मैदानावर होणाऱ्या सामन्यात ३३ वर्षीय डिव्हिलिअर्स याला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात स्नायू दुखावला गेला होता.  
 
 दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्याने काही काळ मैदान सोडले होते. या दुखापतीवर क्रिकेट साऊथ आफ्रिकेने सांगितले की त्याला भारताशी सामन्यापूर्वी फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. 
 
 या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने श्रीलंकेविरूद्ध ४ आणि पाकिस्तान विरूद्ध गोल्डन डकवर बाद झाला होता. 
 
 आपल्या कारकिर्दीत तो पहिल्यांदा गोल्डन डकवर बाद झाला आहे.  डिव्हिलिअर्स सामना खेळला नाही तर ड्युप्लसिसकडे संघाची धुरा देण्यात येणार आहे. तर त्याच्या जागी फरहान बेहारडीन याला संघात स्थान मिळू शकते.