close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनंतर पुनरागमन

मागच्या वर्षाच्या आयपीएल टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात खेळताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Updated: Feb 18, 2019, 04:05 PM IST
वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनंतर पुनरागमन

मुंबई : भारतीय टीमचा विकेटकीपर बॅट्समन वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनी पुनरामगन झाले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकसाठी बंगालाच्या १५ सदस्यीय संघात त्याला स्थान दिले आहे. आपल्या पुनरागमनावर प्रतिक्रिया देतना सहा म्हणाला की, 'माझ्यासाठी ही एक  नवी सुरुवात आहे'.

मागच्या वर्षाच्या आयपीएल टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात खेळताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे सहाला टीमबाहेर बसावे लागले. या संधीचा फायदा ऋषभ पंतला झाला. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय टीममध्ये स्थान मिळवले. साहा मागच्यावर्षी आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबादकडून खेळला होता. ३४ वर्षीय वृद्धीमान साहा म्हणाला की, टीममध्ये निवड होईल, हा विचार करुन मी खेळत नाही. टीममध्ये निवड होणं माझ्या हातात नाही. माझं त्याच गोष्टींवर लक्ष आहे, ज्यावर माझे नियंत्रण आहे. मला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचे प्रयत्न करतो. जे माझ्या हातात आहे'.