अफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये

  फिरकी गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडला गुरूवारी २०२ धावांनी पराभूत केले. या शानदार आणि ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तान अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. 

Updated: Jan 25, 2018, 09:17 PM IST
अफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये  title=

क्राइस्टचर्च :  फिरकी गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडला गुरूवारी २०२ धावांनी पराभूत केले. या शानदार आणि ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तान अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. 

आता ऑस्ट्रेलियाशी मुकाबला...

सर्वांना आश्चर्याचा धक्का देत अंतीम चार संघात अफगाणिस्तानने स्थान बनविले आहे. आता त्यांचा सामना दिग्गज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून ३०९ धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना किवींचा संघ २८.१ षटकात १०७ धावाच करू शकला. ३१० धावांचा पाठलाग करताना यजमान संघाची खूप वाईट सुरूवात झाली.  २० धावांवर ४ विकेट गमावल्या. यानंतर पाचव्या विकेटसाठी क्लार्क आणि फिलिप्सच्या जोडीने ६६ धावा जोडल्या. 

लेग स्पिनर कैस अहमद आणि मुजीब यांनी प्रत्येक ४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या डावाला सुरूंग लावला. अफगाणीस्तानकडून यापूर्वी रहमानुल्लाह गुरबाज ६९ आणि इब्राहिम जादरान ६८ धावा काढत पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागिदारी केली होती. 
त्यानंतर बशीर शाह नाबाद ६७ आणि ओमारजाई ६६ धावांची खेळी केल्याने अफगाणिस्तानने ३०९ धावांचा विशाल स्कोअर केला.