Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता

Updated: Feb 4, 2023, 01:34 PM IST
Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल title=

Team India Player Contract : टीम इंडियासाठी (Team India) नव्या वर्षाची म्हणजे 2023  वर्षाची सुरुवात अगदी दमदार झाली आहे. आधी श्रीलंकेला (Sri Lanka) आणि नंतर न्यूझीलंडला (New Zealand) धुळ चारत टीम इंडियाने इतिहास रचला. या जोरावर एकदिवसीय मालिका आणि टी20 मालिकेत भारताने आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking) अव्वल स्थानही पटकावलं आहे. याच वर्षी भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप होणार  आहे आणि त्याआधी टीम इंडियाची ही कामगिरी मनोबल वाढवणारी आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट बोर्ड आता लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 

हे खेळाडू होणार मालामाल
बीसीसीआय लवकरच खेळाडूंच्या कराराची (BCCI Central Contracts) घोषणा करण्याची शक्यता आहे. याअंतर्गत टीम इंडियाचे काही खेळाडू मालामाल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya), मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav0 आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या ग्रेडमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या हे तिनही खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये आहेत आणि याचा त्यांना करारामध्येही फायदा होणार आहे. 

हार्दिक, सूर्या आणि गिल 'ए' ग्रेडमध्ये?
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या 'बी' ग्रेडमध्ये आहे. गेल्या काही मालिकेतील त्याची कामगिरी पाहता हार्दिक पांड्याची ए ग्रेडमध्ये बढती होऊ शकते. 2022 वर्ष गाजवणारा सूर्यकुमार यादवचाही ए ग्रेडमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बी ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये तर ए ग्रेडमधल्या खेळाडूंना दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात. या यादीत आता भारताचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिलचाही समावेश होण्याची शक्यात असते. 

या खेळाडूंना बसणार फटका
एकीकडे काही खेळाडूंचा ग्रेड वाढणार असला तरी काही खेळाडूंना फटकाही बसणार आहे. मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) खेळाडूंच्या करार यादीतून बाहेर होऊ शकतात. हे दोन्ही खेळाडू मोठ्या काळापासून टीम इंडियापासून दूर आहेत. ईशांत शर्मा टीम इंडियासाठी आपला शेवटचा सामना नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता. याशिवाय टीम इंडियाचा विकेटकिपर ऋधीमान साहादेखील या यादीतून बाहेर पडू शकतो. गेल्या वर्षभरापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.