आम्हाला तुझा अभिमान! 100 वनडे खेळणारी हरनमप्रीत कौर ठरली 5वी भारतीय महिला खेळाडू

हरमनप्रीत कौरने आतापर्यंत 100 वनडे सामने खेळले आहेत.     

Updated: Mar 7, 2021, 07:18 PM IST
आम्हाला तुझा अभिमान! 100 वनडे खेळणारी हरनमप्रीत कौर ठरली 5वी भारतीय महिला खेळाडू

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौरने आतापर्यंत 100 वनडे सामने खेळले आहेत. हरनमप्रीतने कमालीची कामगिरी बजावत पाचवी भारतीय महिला खेळडू असल्याचा विक्रम नोंदविला आहे. हरमनप्रीत कौर 100 वनडे आणि टी-20 मॅच खेळणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे हरमनप्रीत कौरने स्वत: च्या करिअरमध्ये आतापर्यंत 2412 धावा केल्या आहेत. तर तिच्या नावावर 11 अर्धशतक आहेत. 

तसेच वनडे मॅचमध्ये तिने नाबाद 171 धावांचं सर्वश्रेष्ठ स्कोर करत सर्वांतच्या मनात घर केलं आहे. 2017 मध्ये  विश्वचषकात तिने  ऑस्ट्रेलिया विरुध्द 115 चेंडूत 171 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला टी-20 टीमची कर्णधार आहे. तर क्रिकेटमधील सर्वात लहान फ़ॉर्मेटमध्ये हरमनप्रीत कौरने  114 सामने खेळून 2186 धावा स्वतःच्या नावावर केल्या आहेत.

भारतीय टीममधून हरमनप्रीत कौरने पहली वनडे मॅच 2009 मध्ये खेळली होती. तसेच T20I खेळण्याची संधी तिला 11 जून 2009 मध्ये मिळाली . तर भारतीय टीमकडून फक्त 2 टेस्ट खेळण्यात आले आहेत. मात्र हरमनप्रीत कौरच्या अगोदर मिताली राज (210), झूलन गोस्वामी (183), अंजुम चौपड़ा (127) आणि अमिता शर्मा (116) यांनी भारतीय टीमकडून 100 वनडे मॅच खेळल्या आहेत.