मुंबई : IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंचा मोठा भरणा आहे. अनेक खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण सामना खेळताना दिसतील, यात युवराज सारखा एक खतरनाक फलंदाज असणार आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संधी दिली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत 31 वर्षीय फलंदाज पदार्पण करु शकतो. हा खेळाडू दुसरा कोणी नसून आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवणारा राहुल त्रिपाठी आहे. गेल्या दोन मालिकांपासून संधीची वाट पाहणाऱ्या राहुल याचा झिम्बाब्वेविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून आपल्या संधीची वाट पाहत होता, पण सध्याचा संघ पाहता हा खेळाडू झिम्बाब्वेच्या भूमीवर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे दिसते.
राहुलला इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध सामन्यात बाहेर बसावे लागले. टीम इंडियाने नुकताच इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांमध्ये राहुल त्रिपाठी टीम इंडियाच्या संघात होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलला मधल्या फळीत ठेवल्याने टीम इंडियाला खूप फायदा मिळेल. दीपक हुडा आणि इशान किशन यांच्यासोबत तो चमत्कार करू शकतो.
राहुल त्रिपाठी याने आयपीएलमध्ये सलामीवीर आणि खालच्या क्रमवारीत फलंदाजी करतो. IPL 2022 मध्ये राहुल त्रिपाठी खूप यशस्वी ठरला होता. या मोसमातही त्याने 14 सामन्यांत 414 धावा केल्या. या शानदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात दिले आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 76 सामने खेळले आहेत, या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1798 धावा आहेत. हा खेळाडू पहिल्या T20 फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळताना दिसेल, अशी अपेक्षा होती, पण आता राहुल टीम इंडियासाठी वनडेमध्ये पदार्पण करु शकतो.
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.