जो रूटने इनिंग संपल्यावर त्याचे घामाने भिजलेले सर्व कपडे मैदानाच्या बाउंड्री लाईनवर सुकायला ठेवले. त्याने आपली जर्सी, ट्राउजर एवढंच नाही तर अंडरवियरही मैदानात सुकवायला ठेवली. जो रूटने बाउंड्रीवर सुकवायला ठेवलेल्या कपड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Joe Root was drying his wet kit in the Multan sun after the heroic innings. The Barmy Army] pic.twitter.com/70ZJijIcWQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2024
हेही वाचा : Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण
जो रूट आणि हॅरी ब्रूकने एक टेस्ट इनिंग दरम्यान आपापली द्विशतके पूर्ण करून इतिहास रचला. यापूर्वी अशी कामगिरी टेस्ट क्रिकेटमध्ये 39 वर्षांपूर्वी म्हणजेच 1985 मध्ये झाली होती. जानेवारी 1985 मध्ये, भारताविरुद्ध चेन्नई टेस्ट खेळताना इंग्लंडचे फलंदाज माईक गॅटिंग आणि ग्रॅमी फॉलर यांनी त्याच टेस्ट इनिंगमध्ये आपापली द्विशतके पूर्ण केली होती. माइक गॅटिंगने 207 धावा केल्या होत्या. तर ग्रॅमी फॉलरने 201 धावांची खेळी केली होती. या टेस्ट सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 विकेट्स राखून पराभव केला होता.1985 नंतर हा पहिलाच प्रसंग होता जिथे इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी एकाच टेस्ट इनिंगमध्ये त्यांनी आपापली दुहेरी शतक पूर्ण केली. लंच ब्रेक पर्यंत जो रूटने 368 बॉलमध्ये 259 धावा केल्या. तर हॅरी ब्रुकने 257 बॉलमध्ये 218 धावा करून नाबाद खेळी केली. हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी 409 धावांची पार्टनरशिप केली.