भारत-बांगलादेशमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात रियान परागने टाकलेला एक चेंडू पाहून अम्पायरदेखील चक्रावले. अजब अॅक्शन करत टाकलेल्या या चेंडूला अमपायरने अखेर नो बॉल दिला. रियान पराग 11 वी ओव्हर टाकण्यासाठी आला होता. यावेळी चौथा चेंडू टाकताना परागने तो वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा निर्णय घेतला. परागने यावेळी भलत्याच प्रकारे चेंडू टाकला. त्याची अॅक्शन पाहून अनेकांना केदार जाधव आठवला. परागने खेळपट्टीच्या बाहेर जाऊन हा चेंडू टाकला आणि त्यामुळे त्याला नो बॉल घोषित करण्यात आलं.
इंग्लंडच्या प्रसिद्ध मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) ठरवलेल्या क्रिकेटच्या नियमांचा 21.5 कायदा खालील गोष्टींचा उल्लेख करतो. "गोलंदाजाचा मागचा पाय आत पडला पाहिजे आणि रिटर्न क्रीझला स्पर्श करू नये. तसंच त्याची गोलंदाजीची पद्धतही महत्त्वाची असते. अटींची पूर्तता होत नसेल तर अम्पायर त्या चेंडूला नो बॉल घोषित करु शकतात.
याचा अर्थ असा की ज्या क्षणी परागचा मागचा पाय आखलेल्या पांढऱ्या पट्टीच्या पलीकडे गेला, तो क्षण नो बॉल असणार होता. परागचा पाय केवळ ट्रामलाइनच्या बाहेरच पडला नाही तर तो पूर्णपणे खेळपट्टीच्या बाहेर पडला. अम्पायर्सला काही गोष्टींची खात्री करण्याची गरज होती. पण अखेर नो बॉल ठरवण्यात आलं.
What was that Riyan Parag ? #INDvsBAN pic.twitter.com/JAOTn2mLZM
— sajid (@NaxirSajid32823) October 9, 2024
दरम्यान पराग पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा सामान्यपणे गोलंदाजी केली. पण फ्री हिटवर त्याने महमुदुल्लाला कोणत्याही अतिरिक्त धावा करण्यापासून रोखले. फक्त दोन चेंडूंनंतर, मेहदी हसन मिराझने लाँगऑफवर रियान परागला स्लॉग करण्याचा प्रयत्न केला आणि रवी बिश्नोईच्या हाती झेल दिला.
परागने फलंदाजी करताना अखेरच्या ओव्हर्समध्ये दोन षटकार ठोकत 15 धावा केल्या. त्याच्या तडाकेबंद खेळीमुळे भारताला शेवटच्या क्षणी मोठी धावसंख्या उभारण्यात मदत मिळाली. भारताने बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर 20 षटकांत 221 धावा केल्या. भारताने 86 धावांनी हा सामना जिंकला.