India vs West Indies Test : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पहिल्या कसोटी (Ind vs WI First Test) मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (West Indies) 2 कसोटी सामने, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. यातला पहिला कसोटी सामना बुधवारपासून डोमिनिका (Dominika) मध्ये खेळवला जाईल. पहिल्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. नव्या जर्सीसह भारतीय खेळाडूंचं फोटोशूट करण्यात आलं. पण ही जर्सी पाहून क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत.
टीम इंडियाच्या नव्या जर्सीच्या खांद्यावर निळ्या रंगाचे तीन पट्टे आहेत. जर्सीवर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात ड्रीम 11 लिहिण्यात आलं आहे. ड्रीम 11 ही टीम इंडियाची नवी स्पॉन्सर टीम आहे. टीम 11 आणि बीसीसीआय दरम्यान 350 कोटीचा करार झाला आहे. पण या जर्सीवर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जर्सीत लाल रंग का?
टीम इंडियाच्या टेस्ट जर्सीत लाल रंगातील अक्षरं ठळकपणे दाखवण्यात आली आहे. त्यामुळे पांढरी जर्सा, खांद्यावर निळ्या पट्ट्या आणि छातीवर लाल रंगात नाव असा लूक दिसत असून जर्सी कलरफूल दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. इतकंचा नाही तर काही चाहत्यांनी ही कसोटी सामन्याची जर्सी आहे की एकदिवसीय सामन्याची असा सवालही उपस्थित केला आहे.
जर्सीवरुन टीम इंडियाचं नाव गायब
विशेष म्हणजे टीम इंडियाच्या नव्या जर्सीवरुन इंडिया नाव गायब आहे. करारानुसार हे करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. वास्तविक बाइलेट्रल मालिकेत जर्सीच्या पुढच्या बाजूला स्पॉनस्रचं नाव दिलं जातं. तर आयसीसी टूर्नामेंटसमध्ये देशाचं नाव लिहिलं जातं.
Indian Top 5 in Tests cricket. pic.twitter.com/cZX1lmS7lq
— Johns. (@CricCrazyJohns) July 11, 2023
WTC साठी विजय गरजेचा
टीम इंडिया जर्सीवरुन ट्रोल होत असली तर वेस्टइंडिजविरुद्ची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया सलग दुसऱ्यांना हरली आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या हंगामातील पहिली मालिका खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहायचं असेल तर टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.