T20 World Cup : Ind Vs Pak सामन्याआधीच भिडले हरभजन- अख्तर

पाहा असं झालं तरी काय.... 

Updated: Oct 19, 2021, 08:09 AM IST
T20 World Cup : Ind Vs Pak सामन्याआधीच भिडले हरभजन- अख्तर title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Ind Vs Pak:  टी20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघामध्ये होणारा सामना हाय व्होलटेज सामना ठरणार असं म्हणायला हरकत नाही. टी20 विश्वचषकाची सुरुवात झाली असून, आता सर्वांच्याच नजरा या सुपर संडे सामन्यावर खिळल्या आहेत. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. पण, त्याआधीच संघातील दोन खेळाडूंमध्ये काहीसे मतभेद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मैदानात असणारी चुरस ठीक, पण आता मात्र हे खेळाडू मैदानाबाहेरच भिडले आहेत. तेसुद्धा थेट सोशल मीडियाच्या पीचवर. बरं त्यांचे हे मतभेद खरेखुरे नसून विनोदी अंदाजात आहे हे स्पष्ट केलं जाणं महत्त्वाचं. 

शोएब अख्तरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. तुमच्याकडे 400 विकेट्स असतात तेव्हा तुम्हाला क्रिकेटमधलं सगळं कळतं, त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे 200 विकेट्स आहेत. हरभजनच्या या ट्विटला उत्तर देत, अगदी बरोबर भज्जी असं ट्विट शोएब अख्तरनं केलं. सोबत फोटोही जोडला. त्यांची ही सोशल मीडियावरची खेळी फॉलोअर्सना चांगलीच रुळवून गेली. 

शोएब अख्तर आणि हरभजन सिंग हे दोघंही मैदानात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरीही मैदानाबाहेर मात्र ते एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते अनेकदा काही कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र दिसतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से सर्वदूर प्रसिद्ध आहेतच. आता त्यांची ही टिवटीव त्यातच भर टाकत आहे. 

24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. टी20 विश्वचषकाबाबत सांगावं तर आतापर्यंत हे गोन्ही संघ 5 सामन्यांसाठी मैदानात आले आहेत. यामध्ये पाचही सामने भारताच्या संघाने जिंकले आहेत. पण, यावेळी मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं मात्र भारतीय संघाला नमवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तेव्हा आता त्याचा विश्वास कितपत खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे