close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Jab Kaif met : मोहम्मद कैफने सांगितलं कतरिनासोबतचं नातं

....अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण   

Updated: Jun 5, 2019, 02:49 PM IST
Jab Kaif met : मोहम्मद कैफने सांगितलं कतरिनासोबतचं नातं

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आपल्या अनोख्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद कैफ या खेळाडूच्या ट्विटर अकाऊंटची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. कैफने पोस्ट केलेला एक फोटो आणि त्यासोबतचं कॅप्शन हे या चर्चेमागचं मुख्य कारण ठरत आहे. कारण हा फोटो आहे कतरिना कैफसोबतचा. 

Finally the Kaif’s meet, असं कॅप्शन देत मोहम्मद कैफने कतरिनासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या दोघांच्याही चेहऱ्यावर या भेटीचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. कैफने या फोटोसह आणखी एक ओळही लिहिली आहे. 'जसं मी आधीही सांगितलं होतं..... आतापर्यंत(आमच्यात) कोणतंच नातं नाही. माणुसकीचं नातं मात्र याला अपवाद आहे'. मुख्य म्हणजे आडणावातील साम्यामुळे त्यांच्यात नेमकं कोणतं नातं आहे, याविषयीचे अनेक प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात घर करुन होते. ज्याचं उत्तर आता स्वत: मोहम्मद कैफनेच दिलं आहे. 

क्रिकेट विश्वचषकाची रंगत दिवसागणिक वाढत असतानाच अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळचेच हे फोटो आहेत. बी- टाऊनमधील सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी ही यावेळी त्यांच्या 'भारत' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रमात सहभागी झाली होती. खुद्द सलमाननेही सोशल मीडियावर यासंबंधीचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील आणखी एक खेळाडू दिसत होता. तो खेळाडू होता इरफान पठाण. मुख्य म्हणजे भाईजान सलमान आणि इरफान पठाण यांच्या उपस्थितीतही ही भेट चर्चेत आली ती म्हणहे मोहम्मद कैफ आणि कतरिनाच्याच फोटोमुळे.