गंभीरप्रमाणंच रोहितची क्रिकेट कारकिर्द संपणार? जाणून घ्या कारण

पाहा का सुरु आहे अशी चर्चा... 

Updated: Nov 4, 2020, 04:57 PM IST
गंभीरप्रमाणंच रोहितची क्रिकेट कारकिर्द संपणार? जाणून घ्या कारण title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं धक्कादायक वृत्त सध्या समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रोहितचं नाव संघाच्या यादीत वगळण्यात आलं. त्याच्या दुखापतीचं कारण देत यातून सावरण्यासाठी त्याला वेळ देत असल्याचं कारण BCCI कडून देण्यात आलं. पण, तिथं IPL 2020 मध्ये मात्र हैदराबादविरोधातील सामन्यातील प्रदर्शनानं आपण शारीरिकदृष्ट्या ठणठणीत असल्याचं एका अर्थी त्यानं सिद्ध केलं. 

किंबहुना सामन्यानंतरही आपल्या हॅमस्ट्रींगद दुखापतीबाबत सांगताना मैदानात परतून आपल्याला फार चांगलं वाटत असून, येत्या काळात आमखीही काही सामने खेळायचे असल्याचं त्यांनं सांगितलं. 
एकिकडे रोहित स्वत:च आपण चांगल्या अवस्थेत असल्याचं सांगत असतानाही दुसरीकडे मात्र त्याची निवड न होण्यावर आता काही प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. 

रोहितच्या कारकिर्दीतील आकडेवारी पाहिली असता त्यानं आतापर्यंत भारतीय संघाकडून ३२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं २१४१ धावा केल्या आहेत. तर, २२४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं ९११५ धावांचा डोंगर रचला आहे. १०८ टी२० सामन्यांत त्यानं २७७३ धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता रोहित संघातील एक अनुभवी खेळाडू असल्याचं स्पष्ट होत आहे. पण, आता त्याची निवड का करण्यात आली नाही हाच मुख्य प्रश्न उभा राहत आहे. 

अनेकांनानी या संदर्भात गौतम गंभीरशी त्याची तुलना केली आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही गौतम गंभीरला संघातून वगळण्यात आलं होतं. टी२० विश्वचषक असो किंवा मग २०११ मधील विश्वचषक स्पर्धा. गंभीरनं प्रभावी खेळाचं प्रदर्शन करुनही त्याला संघात फार काळ स्थान मिळालं नाही. पाहता पाहता सक्रिय क्रिकेट जगतातून हे नाव दिसेनासं झालं. 

 

२०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. ज्यानंतर संघात कमबॅक करण्यासाठी नाममात्र संधी देण्यात आल्या. पुढं पाहता पाहता गंभीर संघातच दिसेनासा झाला. परिमामी सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितचं नाव न येणं हा निव्वळ योगायोग आहे की कोणता इशारा हाच प्रश्न आता क्रीडा रसिकांच्या मनात घर करु लागला आहे.