विराट कोहलीच्या टार्गेटवर आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, हे पाहा संपूर्ण वेळापत्रक

 विराट कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला टेस्ट, वन डे आणि टी-२० सीरीजमध्ये ९-०ने पराभूत केल्याने विक्रम बनविलेली टीम इंडिया आता घरच्या मैदानावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 8, 2017, 04:01 PM IST
 विराट कोहलीच्या टार्गेटवर आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, हे पाहा संपूर्ण वेळापत्रक  title=

मुंबई :  विराट कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला टेस्ट, वन डे आणि टी-२० सीरीजमध्ये ९-०ने पराभूत केल्याने विक्रम बनविलेली टीम इंडिया आता घरच्या मैदानावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. 

सर्वात प्रथम कोहली ब्रिगेड ऑस्ट्रेलिया टीमशो दोन-दोन हात करणार आहे. त्यानंतर ते किवी टीमशी सामना करणार आहे. त्यामुळे विराट कोहलीने आतापासून कंबर कसली असून दोन्ही संघाना क्लिन स्वीप देण्याची तयारी सुरू केली आहे. 

बीसीसीआयने पुढील दोन सिरीजचे वेळापत्रक घोषीत केले आहे. 

या ठिकाणी पहिल्यांदा होणार टी -२० 

गुरूवारी घोषीत करण्यात आलेल्या शेड्युलमध्ये टी-२० सामन्यांसाठी दोन नवीन मैदानांची निवड करण्यात आली आहे. यात गुवाहाटी  आणि तिरूवनंतपुरमचा समावेश करण्यात आला आहे. 

कांगारूंसोबत ५ वन डे आणि ३ टी -२० 

१२ सप्टेबर - प्रॅक्टीस मॅच - चेन्नई 

१७ सप्टेंबर- पहिली वनडे- चेन्नई, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

२१ सप्टेंबर- दुसरी वनडे- कोलकता, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

२४ सप्टेंबर- तिसरी वनडे- इंदूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

२८ सप्टेंबर- चौथी वनडे- बंगळुरू, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

१ ऑक्टोबर- पाचवी वनडे- नागपूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

टी-२० 

७ ऑक्टोबर- पहिली टी-20- रांची, डे-नाईट, सायंकाळी ७ वाजता 

१० ऑक्टोबर- दुसरी टी-20- गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता 

१३ ऑक्टोबर- तिसरी टी-20- हैदराबाद , सायंकाळी ७ वाजता 

न्यूझीलंडसोबत ३ वन डे आणि ३ टी -२०

१७ ऑक्टोबर - पहिला सराव सामना - सीसीआय, मुंबई 

१९ ऑक्टोबर - दुसरा सराव सामना - सीसीआय, मुंबई 

२२ ऑक्टोबर - पहिली वन डे, मुंबई, दुपारी १.३० वाजता 

२५ ऑक्टोबर - दुसरी वन डे, पुणे, दुपारी १.३० वाजता 

२९ ऑक्टोबर - तिसरी वन डे, (यूपीसीए ), दुपारी १.३० वाजता 

टी - २० 

१ नोव्हेंबर - पहिला टी २० - नवी दिल्ली, सायंकाळी ७ वाजता 

४ नोव्हेंबर - दुसरा टी -२०, राजकोट, , सायंकाळी ७ वाजता 

७ नोव्हेंबर - तिसरा टी-२०, तिरुवनंतपुरम, सायंकाळी ७ वाजता